इथे येणारे जगभरातले वेडे...

10 अप्रैल 2010

अजुन एक लव इस्टोरी....


साध्या सरळ आयुष्यात फारच गड़बड़ झाली आहे।
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे॥

आधी सिगरेट दैनिक होती आणी अंघोळ "विकली" होती ।
दाढीपण फ़क्त अमावस्येलाच होती, लाइफ कशी कुल होती॥

सिगरेट आता सुटली आहे, अंघोळ दिवसात दोनदा आहे।
दाढ़ी आता अमावस्येच्या जागी सूर्यास्ताला आहे, लाइफ मधे एकदम एन्थ्रू आला आहे॥

दिसली माल मुलगी वाजव शिट्टी, भेटला सुम्या तर उडव खिल्ली।
वेळच भेटला तर कर भंकसगिरी, एकून सर्व आदर्श जीवन-पद्धति होती ॥

पोरगी दिसता आता शिट्टी वाजत नाहि , दोस्त लोकांची आजकल खिल्ली उडत नाही।
भंकसगिरी तर पूर्ण विसरलो, एकुण आपण जेंटलमन झालो॥

पिक्चर पहायचा? 'नील'-कमल पाहु,भूक लागली तर वडा-पाँव खाऊ।
शर्ट घालायचा ? लालभडक एकदम फंडू, हेयरस्टाईल कोणती साला टक्कल करू

आता मात्र "DDLJ" चे परायण करतो आहे, काटा-चमचा वापरून पिज्जा खातो आहे।
इस्त्रिवाला फ़ॉर्मल शर्ट पैन्ट मधे इन करतो, तेल लावून केसांना, 'कोम्बडा' पाडून भांग काढतो ॥

नशीब खुलले lotary लागली, "CCD" मधे कोफी ची तिने ऑफ़र केली।
वाटले मला माझे कष्ट सार्थकी लागले , "खयालो की रानी "चे दिल आपण जितले॥

भेटताच मला तिने मस्त स्माइल दिले, दोन कोंफी आर्डर करून तिने माझ्याकडे पाहिले।
"तुला काही सांगायचे आहे." ती म्हणाली लाजत, मला सगले आधीच कळले मीही बोललो हसत॥

"इश्श", बोलली ती गालावर खळी पाडून, मला तर वाटले माझे लग्नच गेल आटपून।
"तुझा दादा मला आवडतो,तुला कसे कळाले?",ऐकून हे माझे कानच काय दिल सुदधा फाटले ॥

साध्या सरल आयुष्यातली गम्मत सारी संपली आहे।
इथून दूर दिल्ली ला दादा वहिनी मजेत आहेत...

5 टिप्‍पणियां: