इथे येणारे जगभरातले वेडे...

16 अप्रैल 2010

पुन्हा एकदा .......!!!!!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घंटा होताच मित्राशी सायकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे॥ ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघांच्या बाकावर ३ मित्र बसण्याचा आनंद लुटायचाय...!!!

( ही कविता मला ऑरकुट वर भेटली, मला आवडली आणी मी लगेच ती ब्लॉग वर टाकली...)

11 अप्रैल 2010

नवीन जागा ...

आता मी या पत्त्यावर ही उपलब्ध ...
इथे क्लिक करा ...

रविवार -- एक आळशी दिवस ...

यार मला कळतचं नाही या रविवार मधे काय असे आहे की साला पूर्ण शरीर जड़ आणी आळशी होउन जाते.
एक तर झोप उशिरा उघडते. एक तर माझ्या हॉस्टल ला आधीच सगळे कुम्भकर्ण आहेत.त्यात रविवारी असा आलस येतो की १०:३० पर्यंत झोप तर कशीच उघड़त नाही. मग उठून नाश्ता, जेवण आणी दुआरी आंघोळ झाली की पुन्हा झोप यायला सुरवात .जेवण मुद्दाउमच रुम मधे घेवुन आलो . आणी कोंनेक्ट केल नेट . विचार केला की काही लिहाव तर त्याचाही कंटाल येऊ लागला . मग विचार केला रविवार बद्दलच लिहाव . ॥ अशीच एक कनटाळवाणी पोस्ट..... बाकी नंतर कधी लिहायचा प्रयत्न करेन॥ सध्या तरी निद्रादेविच्या हाकेला ओ द्यावी ॥
मला माहित आहे की पोस्ट फारच काहीतरी लिहायचा म्हणून लिहिल्यासारखी वाटते पण काय करू ...
रविवार चा महिमा....

10 अप्रैल 2010

अजुन एक लव इस्टोरी....


साध्या सरळ आयुष्यात फारच गड़बड़ झाली आहे।
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे॥

आधी सिगरेट दैनिक होती आणी अंघोळ "विकली" होती ।
दाढीपण फ़क्त अमावस्येलाच होती, लाइफ कशी कुल होती॥

सिगरेट आता सुटली आहे, अंघोळ दिवसात दोनदा आहे।
दाढ़ी आता अमावस्येच्या जागी सूर्यास्ताला आहे, लाइफ मधे एकदम एन्थ्रू आला आहे॥

दिसली माल मुलगी वाजव शिट्टी, भेटला सुम्या तर उडव खिल्ली।
वेळच भेटला तर कर भंकसगिरी, एकून सर्व आदर्श जीवन-पद्धति होती ॥

पोरगी दिसता आता शिट्टी वाजत नाहि , दोस्त लोकांची आजकल खिल्ली उडत नाही।
भंकसगिरी तर पूर्ण विसरलो, एकुण आपण जेंटलमन झालो॥

पिक्चर पहायचा? 'नील'-कमल पाहु,भूक लागली तर वडा-पाँव खाऊ।
शर्ट घालायचा ? लालभडक एकदम फंडू, हेयरस्टाईल कोणती साला टक्कल करू

आता मात्र "DDLJ" चे परायण करतो आहे, काटा-चमचा वापरून पिज्जा खातो आहे।
इस्त्रिवाला फ़ॉर्मल शर्ट पैन्ट मधे इन करतो, तेल लावून केसांना, 'कोम्बडा' पाडून भांग काढतो ॥

नशीब खुलले lotary लागली, "CCD" मधे कोफी ची तिने ऑफ़र केली।
वाटले मला माझे कष्ट सार्थकी लागले , "खयालो की रानी "चे दिल आपण जितले॥

भेटताच मला तिने मस्त स्माइल दिले, दोन कोंफी आर्डर करून तिने माझ्याकडे पाहिले।
"तुला काही सांगायचे आहे." ती म्हणाली लाजत, मला सगले आधीच कळले मीही बोललो हसत॥

"इश्श", बोलली ती गालावर खळी पाडून, मला तर वाटले माझे लग्नच गेल आटपून।
"तुझा दादा मला आवडतो,तुला कसे कळाले?",ऐकून हे माझे कानच काय दिल सुदधा फाटले ॥

साध्या सरल आयुष्यातली गम्मत सारी संपली आहे।
इथून दूर दिल्ली ला दादा वहिनी मजेत आहेत...

9 अप्रैल 2010

माझ्या ब्लॉग च नाव KoyotE का?

माझ्या ब्लॉग नाव KoyotE का?

तुम्ही कधी लहानपणी पंचतंत्र वाचले किंवा ऐकले काय?
त्यात एक कोल्हा प्राणी असतो... प्रत्येक वेळेला हा कोल्हा आपल्या हुशारीने आपले काम साधून घेतो।
त्यात कधी तो कुणाला मुर्ख ही बनवतो... पन त्याच्या बुद्धीचे मला आत्तापर्यंत खुप कौतुक वाटत आले आहे।
आजच्या जगात माणसाने कोल्ह्यासारखे चौकस आणी चतुर व्हायची वेळ आली आहे...आपली नजर चहुबाजुला फिरवा। आणी आपला विकास करा। याच्यात माझ्या म्हनन्याचा उद्देश असा नाही की लोकांना मुर्ख बनवावे। पण आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला काय हरकत आहे?
तर अश्या या कोल्ह्याला इंग्रजी लोकांनी COYOTE असे नाव दिले पण आजच्याला अनुसरून मी त्या नावाला थोडा चेंज केले आणी तो आहे KOYOTE...

लवकरच परत येइल नवीन विषयासोबत॥ तोपर्यंत निरोप घ्यावा...


आपलाच KOYOTE...

1 अप्रैल 2010

हा ब्लॉग का ...?

ब्लॉग या प्रकाराशी माझी बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे। पण कधी स्वत: ब्लॉग लिहिल तोही मराठी मधे असे माला स्वप्नातही वाटले नव्हते... अगदी परवाचीच गोष्ट आहे। माझ्या मामाने मला एका ब्लॉग ची लिंक फॉरवर्ड केली . pappilonprasad.blogspot.com... अगदी सुन्दर artikals आहेत... तिथे मला मराठी ब्लॉग विश्वाची ओळख झाली । ॥

मी आता इंजिनीअरिंग करत आहे... त्याच्या आधी बरयाच मराठी बाल्मासिक आणी दैनिकामधे लिहायचो .. आता मराठी ब्लॉग विश्व बद्दल माहिती जाली आणी पुन्हा लिहिण्याची इच्छा जागली....
म्हणुनच..... एक प्रयत्न... कमेन्ट करायला विसरु नका...
तुमचाच विश्वास ...

asmadikancha blog....