इथे येणारे जगभरातले वेडे...

26 अप्रैल 2011

शुभेच्छा


कालपासुन महाराष्ट्र राज्य तांत्रिक विद्यापिठ (MSBTE) ची अतिंम परिक्शा सुरु झाली....
त्याकरता, सर्व विद्यार्थ्यांना हार्दीक शुभ्भेच्छा...!

अस्मादिकांचा पहिला पेपर चांगला गेला.... बघु पुढे काय होते ते.....! ४ तारखे पर्यंत तरी मस्ती नाहि...!

12 मार्च 2011

जापान , भूकंप आणी सुनामी

जापान - उगवत्या सुर्याचा देश....

हा देश सध्या संकटात सापडलाय...
8.9 रित्चेर्स च्या धक्क्याने आणी त्या नंतर च्या विराट सुनामी ने इथल्या लोकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम केलाय ....

फ़क्त क्रिकेट आणी राजकारण च सर्वात मोठे विषय नाहीत
माणुसकी च्या नात्याने त्यांना मदत करने आपले कर्त्तव्य आहे...
मी माझ्या कडून सुरवात केलि आहे ...

तुम्हाला मदत करायची असल्यास इथे टिचकी मारा .....
आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करा आणी आपले मन मेलं नसल्याची गवाही दया .....!

16 जन॰ 2011

माझा इंग्रजी कवितेचा पहिला प्रयत्न...To My Love.....

आज सकाळी अचानक ही कविता सुचली ...
माझ्या एका मित्रावर प्रेरित...
माझी पहिली इंग्रजी कविता ... लगेच Notepad उघडला आणी भरभर उतरवून टाकली...
एखाद्या मुलाची Propose केल्यानंतर तिच्या प्रतिसादाची वाट पाहण्याची ची हुर-हुर आणी बैचैनी शब्दात उतरवायचा प्रयत्न केलाय ...


I'm Waiting for your reply,
No matter what you say,
but let it be positive i pray,
oh dear, let it come in simple way..

Tonight, when i said, "I LOVE YOU"..
you knew it was true..
Please let me know if you feel the same for me
You feel it, cuz i knew...

Only night has passed to welcome sunrays
but i have felt those 6 hours like thousand days..
and i will be waiting for you today...
Please let it come in simple way...

I'm Waiting for your reply,
No matter what you say,
but let it be positive i pray,
oh dear, let it come in simple way..


BLUE , CREED आणी तत्सम BANDS मनावर परिणाम झालेला दिसतोय... :P

3 जन॰ 2011

College gaarva**


Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
assignment Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
\'PL\'s मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो??



अभ्यास जरा जास्तच आहे दरवर्षी वाटतं,
भर पी.एल. मध्ये टेन्शन मनात येऊन दाटत,
तरीही पाऊले स्टडी रूम कडे चालत
राहतात परंतु मन चालत नाही,
मनामध्ये क्रिटीकल शिवाय दुसरे काहीच घोळत नाही
...तितक्यात एक सिनेमा थेटर मध्ये येतो
टेन्शन ल काही काळ मनापासून दूर नेतो
दिवस घोड्यासारखे भराभर पळत राहतात
calender ची पाने भुर्रकन...s...s...s उडू पाहतात

14 अग॰ 2010

खो मधुशाला... !!!!


आज हातात बच्चन यांचे मधुशाला हे पुस्तक आले...
"मधुशाला" बच्चन यांनी १९३५ मधे लिहिलेला रुँबायांचा संग्रह आहे...
प्रत्येक रुबाई मधे हरिवंशराय यांनी अशी काही जादू भरून टाकली आहे की आजही त्यांची प्रत्येक रुँबाई तेवढीच वास्तविक आणि सुमधुर वाटते ॥
वास्तविकत: बच्चन यांनी कधीही मद्याला स्पर्श केला नाही.... पण तरीही मद्याशालेची मादकता शब्दात उतरवण्यात ते यशस्वी झाले।
या रुबायतुन ते कधी प्रबोधन करतात कधी सामाजिक सन्देश देतात तर कधी खंत व्यक्त करतात याशाठी त्यांनी प्रतिक म्हणून मद्यास्हल्ला वापरलं आहे.
त्यांची एक रुबाई खाली नमुन्याखातर देत आहे आणि मग स्वत:च खो घेवुन त्याचे भाषांतर करतो ... :D
..........
रुबाई क्रमांक ५०: पान क्रमांक ६०

मुसलमान हिन्दू है दो,
एक
, मगर उनका प्याला ,
एक
, मगर उनका मदिरालय,
एक
, मगर, उनकी हाला;

दोनों रहते एक जब तक
मंदिर
मस्जिद में जाते;
बैर बढ़ाते मस्जिद मंदिर,
मे
कराती मधुशाला !
........................................
आणि मी केलेला हा त्याचा स्वैर भावानुवाद :


मुस्लिम आणि हिन्दू जरी आहेत वेगले,
एक
आहे त्यांचा पेला;
एक
आहे त्यांचे मदिरालय,
एक आहे त्यांचे मद्य ;

दोघे एकत्र असतात जोवर,
मंदिर मशिदीत जात नाही;

वाद
वाढवतात मंदिर मशीद,
एकत्र आणते मधुशाला ;
............................................

16 अप्रैल 2010

पुन्हा एकदा .......!!!!!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घंटा होताच मित्राशी सायकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे॥ ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघांच्या बाकावर ३ मित्र बसण्याचा आनंद लुटायचाय...!!!

( ही कविता मला ऑरकुट वर भेटली, मला आवडली आणी मी लगेच ती ब्लॉग वर टाकली...)