14 अग॰ 2010
खो मधुशाला... !!!!
आज हातात बच्चन यांचे मधुशाला हे पुस्तक आले...
"मधुशाला" बच्चन यांनी १९३५ मधे लिहिलेला रुँबायांचा संग्रह आहे...
प्रत्येक रुबाई मधे हरिवंशराय यांनी अशी काही जादू भरून टाकली आहे की आजही त्यांची प्रत्येक रुँबाई तेवढीच वास्तविक आणि सुमधुर वाटते ॥
वास्तविकत: बच्चन यांनी कधीही मद्याला स्पर्श केला नाही.... पण तरीही मद्याशालेची मादकता शब्दात उतरवण्यात ते यशस्वी झाले।
या रुबायतुन ते कधी प्रबोधन करतात कधी सामाजिक सन्देश देतात तर कधी खंत व्यक्त करतात याशाठी त्यांनी प्रतिक म्हणून मद्यास्हल्ला वापरलं आहे.
त्यांची एक रुबाई खाली नमुन्याखातर देत आहे आणि मग स्वत:च खो घेवुन त्याचे भाषांतर करतो ... :D
..........
रुबाई क्रमांक ५०: पान क्रमांक ६०
मुसलमान औ हिन्दू है दो,
एक, मगर उनका प्याला ,
एक, मगर उनका मदिरालय,
एक, मगर, उनकी हाला;
दोनों रहते एक न जब तक
मंदिर मस्जिद में जाते;
बैर बढ़ाते मस्जिद मंदिर,
मेल कराती मधुशाला !
........................................
आणि मी केलेला हा त्याचा स्वैर भावानुवाद :
मुस्लिम आणि हिन्दू जरी आहेत वेगले,
एक आहे त्यांचा पेला;
एक आहे त्यांचे मदिरालय,
एक आहे त्यांचे मद्य ;
दोघे एकत्र असतात जोवर,
मंदिर मशिदीत जात नाही;
वाद वाढवतात मंदिर मशीद,
एकत्र आणते मधुशाला ;
............................................
सदस्यता लें
संदेश (Atom)